एमपीएससी परीक्षांचे केंद्र बदलण्याची संधी उमेदवारांना द्या! युवा सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

247
yuva-sena

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षांचे केंद्र बदलण्याची संधी उमेदवारांना देण्यात यावी अशी मागणी युवा सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एमपीएससीच्या पूर्व व संयुक्त पूर्व परीक्षा जुलै 2020 मध्ये घेतल्या जाणार होत्या. परंतु लॉकडाऊनमुळे त्या 13 सप्टेंबर रोजी घेतल्या जाणार आहेत. बहुतांश उमेदवार हे आपल्या मूळ गावी आहेत.

कोरोनाचा प्रभाव सप्टेंबरपर्यंत कमी होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नसल्याने परीक्षाकेंद्रे वाढवून उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार केंद्रे निवडण्याची संधी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने मुंबई विद्यापीठातील युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शीतल देवरुखकर यांनी दिले आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही माहिती नमूद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या