विद्यार्थ्यांनी शांत राहावे! उगाच कुणाची तरी राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर घेऊ नये!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

एमपीएससी पूर्वपरीक्षा येत्या आठवडाभरात घेतली जाणार असून उद्या शुक्रवारीच परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 14 मार्चला होणारी ही परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलन सुरू केले. या आंदोलकांशी व राज्यातील जनतेशी मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाइव्हमार्फत संवाद साधला आणि विद्यार्थ्यांची दिलगिरी तर व्यक्त केलीच, पण शांत रहा, उगाच कुणाची तरी राजकीय बंदूक तुमच्या खांद्यावर ठेवू देऊ नका, असे आवाहनही केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आज जे वातावरण निर्माण झाले त्या एमपीएससी पूर्वपरीक्षेबद्दल मला बोलायचे आहे. गेल्या वर्षी दिवाळीआधी  एमपीएससी परीक्षांची तारीख जाहीर झाली होती. ही तारीख ज्यावेळी पुढे ढकलण्यात आली तेव्हा मी सांगितले होते की, त्यानंतर तारीख पुढे ढकलण्यात येणार नाही. पण प्रश्न निर्माण झालाय की असं काय झालं की तारीख पुढे ढकलावी लागली? सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी गेले अनेक महिने परिश्रम करीत आहेत. त्यांना मी आश्वासन देतो की, 14 तारखेची ही परीक्षा केवळ काही दिवसांसाठीच पुढे ढकलत आहोत. जो काळ लागतोय तो आपल्या पाल्यांच्या हितासाठी आहे.

राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर ठेवून घेऊ नका!

मनापासून विनंती करतो उगाच कोण भडकवतंय म्हणून भडकू नका. दुसऱयाची राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर ठेवून घेऊ नका. महाराष्ट्राला आधार देणारा हा खांदा आहे. जे काही करतोय ते विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून करतोय. तेव्हा संयम राखा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

वयोमर्यादेची अट आडवी येणार नाही!

परीक्षा पुन्हा कधी होणार ही चिंता सोडा. अनेक विद्यार्थ्यांच्या वयाचा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना सांगू इच्छितो की, कोणीही विद्यार्थी ज्याला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे त्याला वयोमर्यादेची अट आडवी येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

लस घेतलेलेच कर्मचारी परीक्षा केंद्रांवर

कोरोनामुळेच 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, सध्या राज्यामध्ये कोरोना वाढतोय. परीक्षेसाठी पेपर वाटण्यासाठी, सुपर व्हिजनसाठी तसेच अन्य कामांसाठी जो कर्मचारी वर्ग लागतो तो कोरोना रोखण्याच्या कामात गुंतला आहे.  त्यामुळे त्या कर्मचाऱयांवर जर परीक्षेची जबाबदारी सोपवायची असेल तर ते कोरोना निगेटिव्हच असायला हवेत. म्हणूनच या सर्व कर्मचाऱयांची कोरोना चाचणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रांवर पाठवले जाईल. त्याचप्रमाणे त्या प्रत्येक कर्मचाऱयाने कोरोनाची लस घेतलेली असली पाहिजे, अशा सूचनाही मी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. ही जी सर्व काळजी घेतली जात आहे ती विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभर आंदोलन

एमपीएसीमार्फत येत्या रकिकारी 14 मार्चला घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला. अवघ्या दोन दिवसांवर आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे समजातच परीक्षार्थींमध्ये मोठी नाराजी पसरली आणि संतप्त झालेल्या उमेदवारांनी पुणे, नांदेड, संभाजीनगर, हिंगोली, सांगलीसह राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करत परीक्षा रद्द केली जाऊ नये अशी मागणी केली.

महाराष्ट्र राज्य लोकसेका आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या दीड वर्षात पाचक्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे परीक्षार्थी उमेदवारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर होताच रविवारी होणाऱया परीक्षेसाठी पुण्यामध्ये आलेल्या उमेदवारांनी रास्ता रोको आंदोलन करत तीक्र संताप व्यक्त केला. दरम्यान, भाजप आमदार गोपीनाथ पडळकर यांनी या आंदोलकांना शांत करण्याऐवजी त्यांना अधिकच भडकवले. यामुळे पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्सला पाचारण करावे लागले.

एमएससी परीक्षार्थींनी पुण्यात सुरू केलेल्या आंदोलनाच वृत्त पसरताच नांदेड, संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नागपूरसह विविध जिह्यांत एमपीएससी परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. दरम्यान, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एमपीएसीची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य नव्हता. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं आवश्यक होत, असे म्हटले आहे.

युवक कॉँग्रेसच मुंबईत आंदोलन

परीक्षा पुढे ढकलण्याच्या विरोधात युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी मुंबईत एमपीएससी कार्यालयाबाहेर आंदोलन केले. परीक्षा ठरल्या वेळेप्रमाणेच घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.