धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण, रुग्णालयात केले दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांनाही झारखंडची राधानी रांचीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धोनीचे वडील पानसिंग धोनी आणि आई देवकी धोनी यांची नुकतीच कोरोना चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांनाही रांचीतील पल्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवरही येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, झारखंडमध्ये कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 4401 रुग्ण आढळले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 14 मृत रांचीतील आहेत.