
ज्यांच्याकडे घरगुती व व्यावसायिक विजेची थकबाकीची सध्या कारवाई राज्यभर सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर शहरामध्ये सुद्धा आजपासून धडक मोहीम आखण्यात आली आहे. नगर शहरातील सुमारे 32 थकबाकीदारांचे कनेक्शन तोडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे दोन ठिकाणी चोरी केल्याचे उघड झाल्यामुळे त्यासंदर्भातील सुद्धा चौकशी सुरू करण्यात आलेले आहे.
राज्यभरात सध्या महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे. कोणत्या परिस्थितीमध्ये थकबाकी जमा करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्यामुळे आता महावितरणने नगर जिल्ह्यामध्ये ही वसुली मोहीम सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज नगर शहरात ज्या ठिकाणी पावर हाउस केंद्र आहेत. त्याच्या अधिपत्याखाली वसुली पथके नेमली आहे. सकाळपासूनच नगर शहरामध्ये धडक कारवाई सुरू आहे. त्यांच्याकडे तीनशे रुपयांच्या पुढे तर बाकी राहिलेले आहेत. अशांची तात्काळ वीज तोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत. अनेक थकबाकीदारांनी महावितरणने नोटीस बजावली होती. नोटीस बजावून सुद्धा पैसे न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नगर शहरातील रामवाडी, गोकुलवाडी, सर्जेपुरा, कोठलासह विविध ठिकाणचे वीज कनेक्शन तोडलेले आहेत. ज्या ठिकाणी झोपडपट्टीचा भाग आहे. या ठिकाणीसुद्धा सोडून दोन ठिकाणी वीज वापरण्याचा प्रकार उघडकीला आला आहे मात्र याची तपासणी सुरू झालेली आहे.
नगर शहरातील नाळेगाव, सावेडी एमाडिसी या भागांमध्ये घरगुती कनेक्शन व व्यापारी कलेक्शन यामध्ये समावेश आहे. नगर शहरामध्ये आज ही कारवाई सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्यात आली होती. अनेकांनी मुदतीत पैसे भरले नाहीत तर त्यांना दंड सुद्धा भरावा लागणार आहे. यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ज्यांच्याकडे तीनशेपेक्षा जास्त रुपयांची थकबाकी आहे त्यांच्याविरोधात महावितरणने ही धडक मोहीम हाती घेतली आहे आणि त्यात थकबाकीदारांना नोटिसा देऊन सुद्धा अनेकांनी पैसे भरले नव्हते. त्यामुळे शनिवारपासून ही मोहीम हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
























































