एमएसपी व्यवस्था सुरू राहणार, पंतप्रधान मोदींची ग्वाही

राज्यसभेत प्रचंड गदारोळात कृषीविषयक दोन विधेयके मंजूर झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनएसपी व्यवस्था कायम राहील, अशी ग्वाही ट्विट करून दिली.आम्ही शेतकऱ्य़ांच्या सेवेसाठी आहोत. अन्नदात्याच्या मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू आणि त्यांच्या भावी पिढय़ांचे जगणे अधिक सुखकर करू, असे मोदी यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. यामुळे कष्टकरी शेतकऱ्य़ाला मदतच होणार. कृषीविषयक विधेयके मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्य़ांना भविष्यातील तंत्रज्ञान सहज उपलब्ध होणार आहे. त्यातून केवळ उत्पादनच वाढणार नाही, तर इतरही चांगले परिणाम दिसून येतील असे सांगून मोदी म्हणाले.

शेतकऱ्य़ांच्या मृत्यूचे फर्मान काढले, राहुल गांधींची टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सरकारने विधेयकांच्या रूपाने शेतकऱ्य़ांच्या मृत्यूचे फर्मान काढले आहे, अशी जहरी टीका केली आहे. जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो त्याच्या डोळय़ांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. राज्यसभेत कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्य़ांच्या मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे, असे ट्विट राहुल यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या