
एप्रिल आण मे महिन्यात मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. सर्वसामान्यांसाठी राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस हाच सर्वात मोठा आधार असतो. गावी जाण्यासाठी असो अथवा फिरायला जाण्यासाठी ‘लालपरी’ला प्रथम प्राधान्य दिलं जातं. मात्र, आता लालपरीचा प्रवास महाग होणार आहे. 15 एप्रिलपासून एसटीने महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्क्यांनी भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 2 रू. स्वच्छता अधिभार सुद्धा लागू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने आता एसटीच्या भाड्यात हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. मात्र, या हंगामी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच एसटी महामंडळाच्या या हंगामी भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) April 8, 2026
एसटी महामंडळाची 10 टक्के भाडेवाढ फक्त साध्या गाड्यांना लागू असणार आहे. तर शिवनेरी आणि शिवशाही सारख्या वातानुकूलीत बसेसना स्वच्छता अधिभार लागू असणार आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी लालपरीने जाण्यासाठी 281 रुपये मोजावे लागतात. मात्र, आता 15 एप्रिल 2026 पासून 312 रुपये हंगामी भाडेवाढ आणि 2 रुपये स्वच्छता अधिभार, असे एकूण 314 रुपये द्यावे लागणा आहेत.



























































