एम टीव्ही अनप्लग्डचा आठवा सीझन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट एमटीव्ही अनप्लग्डचा आठवा सीझन २६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता एमटीव्हीवर प्रसारित होणार आहे. या सीझनमध्ये सोनू निगम, दिलजित दोसांझ, गुरू रंधावा, रेखा भारद्वाज, कक्कर बहिणी, जोनिता गांधी, अमित मिश्रा, ध्वनी भानुशाली, शाहिद मलय, भुवन भाम, अर्जुन कानुगो आपल्या गाण्यातून मंत्रमुग्ध करतील.

आठव्या सीझनच्या शुभारंभाप्रसंगी वायकॉम 18 यूथ, म्युझिक व इंग्लिश एंटरटेनमेंटचे प्रमुख फेरझाद पालिआ उपस्थित होते. आठव्या सीझनच्या लोकप्रियतेसाठी एमटीव्ही चॅनेलने रेडियो, प्रिंट, डिजिटल, सिनेमा आणि ब्रँड असोसिएशनद्वारे ३६० डिग्री एकत्रित मोहीम राबविली आहे.