मुघल आणि ब्रिटीशांमुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था ढासळली – योगी आदित्यनाथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yogi-happy

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदुस्थान अर्थव्यवस्था कमकुवत होण्यासाठी मुघल आणि ब्रिटीशांना जबाबदार धरले आहे. मुंबई येथे आयोजित जागतिक हिंदू अर्थव्यवस्था फोरममध्ये बोलताना त्यांनी हे सांगितले.

मुघलांनी हिंदुस्थानावर आक्रमण करण्याआधी हिंदुस्थान हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता. हिंदुस्थानची आर्थिक ताकद भरपूर होती. जागतिक अर्थव्यवस्थेत हिंदुस्तानचा एक तृतीयांश म्हणजेच तब्बल 36 टक्के वाटा होता. पण मुघलांनी हिंदुस्थानची मोठी संपत्ती लुटली. जेव्हा मुघल गेले आणि ब्रिटीश आले तेव्हा हिंदुस्थानचा जागतिक अर्थव्यवस्थेतील वाटा घटून 20 टक्क्यांवर आला. ब्रिटीशांनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था अगदी रसातळाला नेली. त्यांच्यामुळेच हिंदुस्थानची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे्, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.