मुकेश अंबानींची घोषणा‘5 जी’ दिवाळीपासून; जगातील सर्वात मोठे ‘5 जी’ नेटवर्क उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिलायन्स जिओची फाइव्ह जी (5 जी) इंटरनेट सेवा दिवाळीपासून प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सुरू होणार, अशी महत्वपूर्ण घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केली. देशामध्ये जगातील सर्वात मोठे ‘फाइव्ह जी’ नेटवर्क उभारणार असून, त्यासाठी 2 लाख कोटींची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

रिलायन्स उद्योग समूहाची 45वी सर्वसाधारण सभा आज झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या सभेत मुकेश अंबानी कोणती घोषणा करणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले होते.

असे असेल फाइव्ह जी नेटवर्क

  • पहिल्या टप्प्यात प्रमुख मेट्रो शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे जिओची 5 जी कनेक्टिव्हीटी सुरू होईल.
  • फाइव्ह जीच्या माध्यमातून 100 दशलक्ष घरांना जोडले जाणार आहे. कनेक्टिव्हीटीच्या माध्यमातून स्मार्ट होम सोल्यूशन उपलब्ध होईल.
  • जिओकडून फाइव्ह जी स्मार्ट पह्न लाँच होणार आहे. हा स्मार्ट पह्न स्वस्त असणार आहे.