मुकेश अंबानी म्हणाले, हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत ‘स्लो डाऊन’ पण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mukesh-ambani

रिलायंस समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत सध्या स्लो डाऊन पाहायला मिळत असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असले तरी हा परिणार कायम राहणार नसून सरकारने नवी पाऊले उचलल्यानंतर पुढील तीन महिन्यांत अर्थव्यवस्थेला गती मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. सौदी अरबमधील रियाद येथे आयोजित ‘फ्यूचर इनवेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ या क्रार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी हे विधान केले आहे.

आजतक वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. 29 ते 31 ऑक्टोबरपर्यंत आयोजित या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य अतिथी होते. या कार्यक्रमासाठी मुकेश अंबानींसह अनेक बडे उद्योगपती देखील सहभागी झाले होते. यावेळी बोलताना अंबानी यांनी देशात सध्या स्लो डाऊन पाहायला मिळत असल्याचे म्हटले आहे. मात्र ते एवढेच बोलून थांबले नाही तर त्यानंतर सरकारने उचलेल्या पावलांमुळे पुढल्या तीन महिन्यांमध्ये परिस्थिती बदलेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.