नगर जिल्ह्यातील मुळा धरण भरले; 11 दरवाजे उघडले, विसर्ग सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ नदीतून विसर्ग सुरू असल्याने नगर शहराला पाणीपुरवठा करणारे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे 11 दरवाजे उघडून दोन हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. नगर शहराची तहान भागविणारे धरण म्हणून या धरणाची ओळख आहे. धरण पूर्ण भरल्याने नगरची पाण्याची समस्या दूर झाली आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात 25 हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या धरणातून सोडलेल्या पाणी साठ्यातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे.

https://youtu.be/B5xsyp0nyXc