समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांना बुधवारी दुपारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु असे मानले जाते की 81 वर्षीय मुलायमसिंह यादव यांच्यावर वृद्धापकाळामुळे आलेल्या आरोग्य समस्येवर उपचार केले जात आहेत. मुलायमसिंह यांना गेल्या काही वर्षांपासून अनेक शारीरिक समस्या भेडसावत आहेत. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गेल्यावर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुलायम यांना कोरोनाचा देखील संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.