आजपासून मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

पालिकेचे मुलुंड डंपिंग ग्राऊंड 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. या ठिकाणी जमा होणारा  1500  मेट्रिक टन कचरा देवनार आणि कांजूर डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार आहे. यामुळे लवकरच मुलुंडकरांची कचऱयाची दुर्गंधी आणि प्रदूषणातून सुटका होणार आहे.

मुलुंड येथे 1968 मध्ये सुरू झालेल्या डंपिंग ग्राऊंडवर सद्यस्थितीत तब्बल 1500 मेट्रिक टन कचरा टाकला जात होता, मात्र या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. शिवाय या डंपिंग ग्राऊंडची क्षमताही संपत आल्याने हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यानुसार या ठिकाणी टाकण्यात येणाऱया 1500 मेट्रिक टन कचऱयापैकी एक हजार मेट्रिक टन कचरा देवनार डंपिंग ग्राऊंडवर तर 500 मेट्रिक टन कचरा कांजूर डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.

कचरा विल्हेवाटीसाठी सहा वर्षे, 650 कोटींचा खर्च

मुलुंड डंपिंग ग्राऊंडवर गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकण्यात येत असल्यामुळे सध्या या ठिकाणी 70 लाख मेट्रिक टनांवर कचरा जमा झाला आहे. त्यामुळे कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. यासाठी पालिकेकडून 650 कोटींचे कंत्राटही देण्यात आले आहे.

नव्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार

–मुंबईत दिकसाला 7,200 मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणारा कचरा मुलुंड, कांजूर क देकनार डंपिंग ग्राऊंडकर टाकण्यात येतो, मात्र सद्यस्थितीत मुलुंड डांपिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने बंद करण्यात आले आहे.

–दरम्यान, देकनार डंपिंग ग्राऊंडकर कारंकार लागणाऱया आगी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे हे डंपिंग ग्राऊंडही काही काळात पालिकेला बंद कराके लागणार आहे. त्यामुळे पालिकेला कचरा टाकणे आणि विल्हेवाटीसाठी नव्या पर्यायांचा शोध घ्यावा लागणार आहे.