मुंबईत एका वर्षात 1 लाख 28 हजार नागरिकांना कुत्रे चावले

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी यासंदर्भात विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान ही माहिती दिली. मुंबई पालिकेने ऑनिमल वेल्फेअर बोर्ड विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या संस्थेमार्फत भटक्या श्वानांचे 2014 मध्ये सर्वेक्षण केले. त्यानुसार 95,172 तसेच 2024 मधील पुनसर्वेक्षणानुसार 90,757 इतक्या श्वानांची नोंद घेण्यात आली आहे.

भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे, श्वानांची वाढती संख्या मर्यादित ठेवणे, रेबीज निर्मूलन करणे, मनुष्य-कुत्रा संघर्ष टाळणे या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्रपणे वेबपोर्टल तयार करण्यात आलेले आहे. तसेच स्वतंत्रपणे हेल्पलाईन क्रमांक (7564976649) प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. भटक्या कुत्र्यांना निवारे बनवण्यासाठी उपनगराचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मोकळय़ा जागा शोधण्यासाठी शोध समितीची स्थापना करण्यात आली आहे.

पश्चिम उपनगरात पिसाळलेला कुत्रा 26 विद्यार्थ्यांना चावला

पश्चिम उपनगरात सध्या पिसाळलेल्या कुत्र्याने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने 26 विद्यार्थ्यांना चावा घेतला. या कुत्र्याला पकडून त्वरित निवारा केंद्रात टाकण्याची मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत माहितीच्या मुद्दय़ाद्वारे केली. उपनगरातील शाळांचा गोरेगाव प्रबोधन आणि सिद्धार्थ नगरमध्ये क्रीडा महोत्सव सुरू आहे. पिसाळलेला कुत्रा 26 विद्यार्थ्यांना चावला. दिंडोशी मतदारसंघातील चार मुलांना कुत्रा चावला. महानगरपालिकेकडे कुत्र्याला पकडून निवारा केंद्रात टाकण्याची कोणतीही व्यवस्था नाही. पालक घाबरले आहेत. त्वरित कुत्र्याला पकडून निवारा केंद्रात टाका असे सांगत सुनील प्रभूंनी सभागृहात फोटोच सादर केले. यावर तालिका अध्यक्ष समीर कुणावार यांनी शासनाने याची त्वरित दखल घेण्याचे आदेश दिले.

– 91 हजार भटके कुत्रे z 30 नागरिकांचा रेबिजने मृत्यू

– कल्याण-डोंबिवलीत कुत्र्यांच्या नसबंदीतही भ्रष्टाचार राज्याच्या अनेक भागांत बिबटय़ाचे हल्ले वाढत असताना मुंबईसारख्या शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मुंबईत 2024 या वर्षात 1 लाख 28 हजार 252 नागरिकांना भटके कुत्रे चावले. राज्यात 40 लाख तर मुंबईत 91 हजार भटके कुत्रे असून 30 नागरिकांचा रेबिजने मृत्यू झाला.