टक्काटक, अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत 61.69 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी जाहीर झालेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीच्या कटऑफमध्ये घसरण झाली आहे. काही ठिकाणी सायन्सचा कटऑफ थोडय़ा फरकाने वाढल्याचे दिसले मात्र आर्ट्स आणि काॅमर्स शाखांचा कटऑफ 1 ते 6 टक्क्यांनी खाली आला आहे. याला अपवाद उल्हासनगर येथील सीएचएम काॅलेज ठरले. या काॅलेजचा तीनही शाखांचा कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. त्याचबरोबर केसी सायन्स शाखा, तसेच मिठीबाई आणि झेवियर्स काॅलेजचा आर्ट्स आणि सायन्स शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ झाली आहे. पहिल्या यादीत मुंबई विभागात 61.69 टक्के विद्यार्थ्यांना काॅलेज अलॉट झाले असून यातील किती विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेतात हे पहावे लागणार आहे. या यादीत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे काॅलेज अलॉट झाले आहे त्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून अन्यथा ते प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार आहेत.