मुंबईत 1,312 नवीन कोरोनाबाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आली असून दिवसभरात 1,312 नवीन रुग्ण आढळले. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10 लाख 43 हजार 59 वर पोहोचली आहे. दरम्यान, 4,990 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 10 लाख 9 हजार 374 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 14 हजार 344 सक्रिय रुग्ण आहेत.

पहिल्यांदाच धारावी ‘शून्य’ पॉझिटिव्ह

मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यापासून आज पहिल्यांदाच धारावीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही माहिती दिली. 39 दिवसांनंतर धारावीत आज एकही रुग्ण आढळलेला नाही. यापूर्वी 20 डिसेंबर 2021 रोजी धारावीत एकही कोरोना रुग्ण नव्हता. सध्या धारावीत यापूर्वी आढळलेले 43 कोरोना रुग्ण असून त्यातील 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.