
कोरोना काळात मुंबईमध्ये वाहनचोरीचे प्रमाण वाढले असून पूर्व उपनगरात गेल्या सात महिन्यांत 235 गाडय़ा चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 100 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले असले तरी 135 गाडय़ांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-6 मध्ये येणाऱया दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या सात महिन्यांत 235 गाडय़ा चोरीला गेल्यात. त्याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपासचक्र फिरवून 100 गाडय़ा शोधून काढल्या. मात्र उर्वरित 100 गाडय़ांचा शोध अद्याप पोलिसांना घेता आलेला नाही. त्यामुळे याची गंभीर दखल घेत परिमंडळ-6 च्या उपायुक्तांनी गाडय़ा चोरीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक, बीट मार्शल, मोबाईल व्हॅन व इतर अधिकारी व कर्मचाऱयांना प्रभावी गस्त घालण्याच्या सूचना केल्या आहेत.
राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटूची बुलेट चोरली
राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू विक्रांत देसाई यांची बुलेट परळच्या आर. एम. भट व्यायामशाळेच्या गेटजवळून एका तरुणाने चोरून नेली. दोन दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास विक्रांत यांनी शाळेच्या गेटबाहेर बुलेट पार्प करून ते व्यायामशाळेत गेले. पण त्याच्या दहा मिनिटांनीच एक तरुणाने बुलेट हाताने ढकलत घेऊन गेला आणि पुढे जाऊन बुलेट चालू करून पळ काढला. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.



























































