
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत आज दिवसभरात 302 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर कोरोना 415 कोरोनाचे रुग्ण सापडले. मुंबईत मृत्यूदर घटले असून आज दिवसभर 4 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 550 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 382 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एपूण संख्या 2 लाख 93 हजार 118 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 94 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 550 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 597 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 28 लाख 79 हजार 835 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 11 हजार 12वर पोहोचली आहे.
राज्यात दिवसभरात 3,513 कोरोनामुक्त
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज 3 हजार 513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 95.76 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 2 हजार 628 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात राज्य सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.51 वर आला आहे.



























































