
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या स्थिर असून गेल्या 24 तासांत 429 नवे कोरोनाबाधित आढळले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या रुग्णांमधील 71 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामधील 20 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. मुंबईत करण्यात आलेल्या 40 हजार 682 चाचण्यांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. गेल्या एकाच दिवसात 822 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईत 3698 सक्रिय रुग्ण आहेत.



























































