महापालिकेत अभियंत्यांची 969 पदे रिक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

पालिकेच्या अभियंता खात्यात तब्बल 969 अभियंता पदे रिक्त असल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. यामध्ये 4482 पदांपैकी 3513 पदे कार्यरत आहेत. मात्र 969 पदे रिक्त आहेत.

‘आरटीआय’ कार्यकर्ते अनिल गलगली यांना पालिकेच्या नगर अभियंता कार्यालयाकडून ही माहिती प्राप्त झाली आहे. गलगली यांनी नगर अभियंता कार्यालयाकडे किभिन्न पदावर कार्यरत असलेली मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. नगर अभियंता कार्यालयाने अनिल गलगली यांस 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2018 असा त्यांच्या कार्यालयात प्राप्त अंतिम तिमाही अहवाल दिला. या अहवालाच्या अनुसार कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उप प्रमुख अभियंताची एकूण 4482 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 969 पदे रिक्त असून 3513 पदाकर अभियंते कार्यरत आहेत. रिक्त पदांमुळे पालिकेच्या कामावर परिणाम होत असल्याचे गलगली यांनी सांगितले. त्यामुळे ही पदे लवकरात लवकर भरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.

उप प्रमुख अभियंता यांची 76 पदे असून यापैकी 46 पदे कार्यरत आहेत तर 30 पदे रिक्त आहेत. कार्यकारी अभियंता यांची 288 पदे असून सध्या 214 पदांकर अधिकारी कार्यरत आहेत. यात 74 पदे रिक्त आहेत.

शिवाय सहाय्यक अभियंताची 781 पदे आहेत त्यापैकी 703 पदे कार्यरत आहेत तर 78 पदे रिक्त आहेत. दुय्यम अभियंताची 2170 पदे असून 362 पदे रिक्त आहेत. सध्या 1808 पदे कार्यरत आहेत. कनिष्ठ अभियंता ही पदे 1167 आहेत. सध्या यापैकी 425 पदे रिक्त असून 742 कनिष्ठ अभियंता कार्यरत आहेत.