विमानतळावरील कंत्राटी कामगारांना विम्याचे कवच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhartiya-kamgar-sena

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱया सुमारे सहा हजार कंत्राटी कामगारांना वैद्यकीय विम्याचे कवच मिळणार आहे. कामगारांना वैद्यकीय विम्याचे कवच मिळावे यासाठी भारतीय कामगार सेनेच्या विमानतळ युनिटने सातत्याने प्रयत्न केले होते. याची दखल घेत विमानतळ प्रशासनाने कर्मचाऱयांची माहिती गोळा करण्याचे कामदेखील सुरू केले आहे.

विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱयांना प्रत्येक वर्षी दोन लाख रुपयांचा वैद्यकीय विमा मिळणार असून या कालावधीत निधन झाल्यास पाच लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांना मिळतील. कर्मचारी अविवाहित असेल तर एकटय़ाला याचा लाभ होईल आणि विवाहित असेल तर कर्मचाऱयाच्या पत्नी आणि मुलांनादेखील याचा लाभ होईल, अशी माहिती भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संजय कदम यांनी दिली.