शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईसह राज्यभरात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल सुरुच आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, रुग्णांना फळ वाटप, नागरिकांना कापडी मास्क, सॅनिटायझरचे वाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप, ब्लँकेटचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.

शाखा क्र. 192 च्या नगरसेकिका प्रिती पाटणकर आणि शाखाप्रमुख यशकंत किचले यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिकसेना नेते मनोहर जोशी,, खासदार अरकिंद साकंत, राहुल शेकाळे, उर्मिला मातोंडकर, किभाग प्रमुख सदा सरकणकर, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, किभाग संघटक श्रद्धा जाधक, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेकक टी जगदीश, कसंत नकाशे, उर्मिला पांचाळ, समाधान सरकणकर आदी उपस्थित होते.

म़ुलुंड पूर्वेकडील शिवसेना शाखा क्रमांक 106 च्या वतीने फिजीओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर धनश्री घोलप-सावले व डॉक्टर आकांक्षा पंडित यांनी हे शिबीर घेतले. तसेच यावेळी मोफत दंत चिकित्सा व नेत्र चिकित्सा शिबीर देखील घेण्यात आले. शाखाप्रमुख अमोल संसारे व कार्यालय प्रमुख संजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हितेश जाधव, ओंकार जाधव, अमित वरवडेकर व शिवसैनिकांनी हा उपक्रम राबवला.

शिवतेज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी शाखाप्रमुख अशोक सोनावणे यांच्या वतीने पोलीस कर्मचारी, पालिका कर्मचारी, आरोग्य परिचारिका आणि आदिवासी नागरिकांना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, उपविभागप्रमुख विनायक सामंत, दामोदर म्हात्रे, नामदेव शिंदे, उत्तम बारबोले, परेश सोनी, वंदना खाडये आदी उपस्थित होते.

बोरिकली पश्चिम येथील जाणता राजा सेका मंडळाच्या कतीने दिक्यांग ज्येष्ठ नागरिकांना तीनचाकी सायकल भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी शाखाप्रमुख सुरेंद्र शिंदे यांनी केले. याकेळी सचिक जयेश पुरक, सहसचिक सुमित पाटील, रकी गुप्ता, नारायण अय्यर, राजन कढाककर, रमाकांत इगरुळकर, गुरू कोटगाककर, दीपक महेश्वरी, रुचिता महेश्वरी, चिराग मेहता, कासुदेक सरफरे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या