बिल्डरच्या खोदकामामुळे बाणगंगेचे पाणी दूषित, काम थांबवण्याचे महापौरांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाणगंगा तलावालगत खासगी विकासकाकडून करण्यात येणाऱया खोदकामामुळे बाणगंगेचे पाणी दूषित होत असल्याने संबंधित विकासकाने भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल महापालिकेला सादर करेपर्यंत सदर काम थांबवावे, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका अधिकाऱयांना दिले.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बाणगंगा तलावाची पाहणी केल्यानंतर महापौरांनी हे आदेश दिले. पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड, हिंदू जनजागृती समितीचे सोनार, गोड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सचिव शशांक गुळगुळी, प्रकल्प अधिकारी ऋत्विक औरंगाबादकर यावेळी उपस्थित होते. महापौर पेडणेकर म्हणाल्या की, बाणगंगेचा ऐतिहासिक ठेवा पुसू नये तसेच नैसर्गिक स्त्राsत जिवंत रहावा यासाठी संबंधित कंत्राटदाराला तातडीने डी विभाग कार्यालयाने नोटीस देऊन काम जैसे थे ठेवण्याचे निर्देश द्यावे. संबंधित विकासक रात्रीच्या वेळेस काम करत असेल तर महापालिका कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. हिंदू जनजागृती समितीने महापौरांना याबाबत निवेदन दिले होते. यात नमूद केले की, सप्टेंबर 2020 पासून बाणगंगा कुंडाजवळ इमारत बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामाला प्रारंभ झाल्यावर बाणगंगेमध्ये येणाऱया नैसर्गिक जलस्त्राsतातून चिखल आणि चिखलमिश्रित पाणी पुंडामध्ये यायला लागले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.