
मुंबईतल्या भांडूपमध्ये घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपाचर सुरू आहेत.
भांडूपच्या एस वॉर्डमध्ये सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी एका गटाराजवळी घराची भिंत कोसळली. त्यात वनिता सावंत (65), योगेश पाल (5) आणि मनिषा पाल (9) हे तीन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.