बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 24 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

1903

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला येणाऱ्या काळात 85 रुग्णवाहिका मिळणार असून त्यापैकी 24 रुग्णवाहिकांचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत बीकेसी येथे लोकार्पण पार पडले.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 30 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहेत, त्यापैकी 12 रुग्णवाहिका पहिल्या टप्प्यात लोकार्पण करण्यात आल्या. त्याचप्रमाणे झी समूह, महिंद्रा एन्ड महिंद्रा, दीपक फर्टिलायझर्स यांनीदेखील 12 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या