कोरोना काळातही ’माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धेला सवा लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर आयोजित केलेल्या बालचित्रकला स्पर्धेला कोरोना काळातही उदंड प्रतिसाद मिळाला असून यात 1 लाख 26 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर ही स्पर्धा घेण्यात आली. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत बालविजेत्यांची नावे जाहीर केली.

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त, ‘माझी मुंबई’ या विषयावर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला ऑनलाइन स्पर्धा 2021-22 चा निकाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापौर भायखळा येथे जाहीर केला. चार गटांत 9 जानेवारीला घेतलेल्या या ऑनलाइन स्पर्धेत 1 लाख 26 हजार 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 25 हजार, दुसऱया क्रमांकाला 20 हजार तर तृतीय क्रमांकाला 15 हजारांचे पारितोषिक तर सर्व उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी 5 हजारांची पारितोषिके जाहीर करण्यात आली. एकूण 6 लाख 90 हजारांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देणार आहेत. या वेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, शिक्षणाधिकारी राजेश पंकाळ उपस्थित होते.

विजेते पहिली ते दुसरी (पहिला गट) ः पहिला क्रमांक आर्यन साबळे, ग. वि. स. मंडळ प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक आज्ञा हिरवे, श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, तृतीय क्रमांक देवांशी मिस्त्र्ााr, उदयाचल.

तिसरी ते पाचवी (दुसरा गट) ः प्रथम क्रमांक श्रवण नाईक, यशोधाम हायस्कूल, द्वितीय क्रमांक शौर्य बोराडे, सिव्रेट हार्ट बॉईज हायस्कूल, तृतीय क्रमांक श्रेय भोसले, श्री बन्सीधर अगरवाल मॉडेल स्कूल.

सहावी ते आठवी (तिसरा गट) ः प्रथम क्रमांक संचिता तांबे, शिव शिक्षण संस्था सेपंडरी इंग्लिश, द्वितीय क्रमांक थिया मिस्त्री, बाई आरएफडी पांडे गर्ल्स हायस्कूल तर तृतीय सरासदफ अलास्कर, शहाजीनगर,

उर्दू क्र. 1. नववी आणि दहावी (चौथा गट) ः प्रथम क्रमांक स्पृहा शिंदे, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल, द्वितीय क्रमांक श्रावणी गोतरणे, युनिव्हर्सल हायस्कूल तर तृतीय क्रमांक अल्फीया खान, माणेकजी गजधर पार्क इंग्रजी मीडियम.