
मुंबईसह राज्यात काढणाऱया कोविड रुग्णांमध्ये ‘कोरोना व्हेरिएंट’चीच लागण असल्याचे जिनोम सिक्वेन्सिंग अहवालामधून समोर आले आहे. त्यामुळे बाधितांमधील नेमका विषाणू शोधून संबंधित व्हेरिएंटवर निश्चित उपचार करण्यासाठी किमान पाच शोध घेणारी ‘बायोफायर’ टेस्ट सर्व सार्कजनिक रुग्णालयांमध्ये सुरू करावी, असा सल्ला ‘टास्क फोर्स’ने राज्य सरकारला दिला आहे. शिकाय सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे उपचार घेऊनही तीन दिवस राहिल्यास रुग्णांनी ‘कोविड टेस्ट’ करावी, असा सल्ला राज्याच्या ‘कोविड टास्क फोर्स’चे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दिला आहे.
मुंबईत सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यासाठी झपाटय़ाने प्रसार वाढवणारे कोरोना व्हेरिएंटच कारणीभूत ठरत असल्याचे समारे आले आहे. पालिकेकडून नुकत्याच केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये 100 टक्के नमुन्यांमध्ये कोरोना व्हेरिएंट ओमायक्रोन, एक्सबीबी, बीक्यू, सीएचएच, बीए, बीएन अशा प्रकारचे उपप्रकार आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर व्हेरिएंटला रोखण्यासाठी ‘बायोफायर’ चाचणी उपयुक्त ठरणार असल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. वाढता कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते.
असा होणार फायदा
खासगी रुग्णालयांमध्ये ‘बायोफायर’ टेस्ट सध्या बहुतांशी प्रमाणात केली जाते. यामध्ये कोविड, एन्फ्लुएंझाचे दोन उपप्रकार, एक्सबीबी, ओमायक्रोन, आरएसव्ही, एच 3एन 2 अशा विषाणूंची लागण समजते. पॅकेजनुसार असणाऱया या चाचणीसाठी आठ हजार ते 13 हजारांपर्यंत खर्च खासगी रुग्णालयांत येतो. मात्र सार्वजनिक रुग्णालयात एकाच वेळी जास्त चाचण्या केल्यास कमी खर्चात जास्तीत जास्त विषाणूंची लागण समजण्यास मदत होणार असल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारला विधायक सूचना टास्क फोर्सने केल्या आहेत. यामध्ये किमान पाच व्हेरिएंटची लागण सांगणारी ‘बायोफायर टेस्ट’, लसींची उपलब्धता आणि अंमलबजावणी, खासगी रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता करण्यास सुचवण्यात आले आहे.
– डॉ. संजय ओक, कोविड टास्क फोर्स प्रमुख
दिवसभरातील रुग्णसंख्या
मुंबई 192
राज्य 694
देश 3016
काळजी घ्यावी
-कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात असलेला धोकादायकपणा आतापर्यंत झालेले लसीकरण आणि वाढलेल्या इम्युनिटी पॉवरमुळे कमी झाला.
-मात्र सहव्याधी असणारे, ज्येष्ठ, लहान मुले, गरोदर स्त्र्ाया, डायबेटीस असणारे, श्वसनाचे विकार असणाऱया ‘हायरिस्क’ गटाने काळजी घ्यावी.
-सद्यस्थितीत मास्कची सक्ती करण्यात आली नसली तरी लक्षणे असल्यास, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा, कोरोना खबरदारी घ्यावी.





























































