
स्वयंपाकघरातील आवश्यक पदार्थांपैकी एक असलेल्या दूधाच्या किंमतीत थेट नऊ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे प्रतिलिटर दर 102 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या दरवाढीमुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडणार आहे.
मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने दुभत्या जनावरांच्या आणि त्यांच्या चाऱ्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन म्हशीच्या दुधाचे घाऊक दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या म्हशीच्या दुधाचे घाऊक दर ९३ रुपये प्रति लिटर आहेत. 1 सप्टेंबरपासून हे दर 9 रुपयांनी वाढून आता १०२ रुपये प्रति लिटर होईल. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांच्या मते, नवीन दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहतील असे सांगितले.



























































