अक्षया ठोंबरे यांना उत्कृष्ट सुलेखनकाराचा जागतिक पुरस्कार

दक्षिण कोरियात झालेल्या जागतिक सुलेखन स्पर्धेत मुंबई येथील सुलेखक अक्षया ठोंबरे यांनी उत्कृष्ट सुलेखनकाराचा पुरस्कार जिंकला. दक्षिण कोरिया येथील चेओंगजू येथे नुकतेच जिकजी आंतरराष्ट्रीय सुलेखन प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ही स्पर्धा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे अक्षया यांना यावर्षी दुसऱ्यांदा उत्पृष्ट सुलेखनकाराचा पुरस्कार जिंकला आहे. कोरियातील हे प्रदर्शन प्रसिद्ध मल्याळम सुलेखक नारायण भट्टाथिरी यांनी आयोजित केले होते.