कोणास ठाऊक कसा, आयआयटीच्या वर्गात ‘हा’ आलाच कसा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई आयआयटीच्या प्रांगणात दोन मोकाट बैलांच्या हल्ल्यात एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच एका मोकाट बैलाने थेट भरवर्गात एन्ट्री करत गोंधळ उडवून टाकला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेमुळे आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आयआयटीच्या प्रांगणात मोकाट जनावरांचा मुक्त संचार असणे ही तशी काही नवीन गोष्ट नाही. पण 11 जुलै रोजी येथेच फिरणाऱ्या दोन बैलांनी एका केरळच्या विद्यार्थ्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखलही करण्यात आले. त्यानंतर कॅम्पसमधील जनावरे हटवण्यात आली. पण त्यानंतर काही दिवसांपासून पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. समन्वयाअभावि पुन्हा गायी म्हशींबरोबर इतर मोकाट प्राण्यांचा वावर आयटीआयटी मध्ये वाढल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वींचा हा व्हिडीओ असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.