मूर्ती लहान , किर्ती महान

33

सामना ऑनलाइन। मुंबई

खेळ मनाला उभारी तर देतोच पण आयुष्याला निश्चित अशी एक दिशाही मिळवून देतो. असचं काहीसं झाल आहे मुंबईतल्या चैतन्य सावे बाबत.खेळाचे हेच तंत्र जपत चैतन्यने लॉन टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. सांताक्रुझ येथे जपान 360 आयोजित, आंतरक्लब लॉन टेनिस स्पर्धेत त्याने लॉन टेनिस स्पर्धेत बारा वर्षाखालील गटात विजेते पद मिळवले आहे. तसेच 14 वर्षाखालील गटात तो उपविजेता आहे.

कांदीवलीच्या चिल्ड्रन अॅकेडमीमध्ये सहावीत शिकणाऱ्या चैतन्यला लॉन टेनिसचे धडे दिले ते रॉडनी सरांनी. त्यांनी दिलेल्या या बळावरच चैतन्यने आज शाळेचे नावही उज्वल केले आहे. चैतन्यच्या विजयामुळे खेळात केवळ उच्चांक नाही तर जोश आणि स्फूर्ती देखील महत्वाची असते हे त्याने दाखवून दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या