Ganeshotsav 2021 -चिंचपोकळीचा चिंतामणी यंदाही चांदीच्या रूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत आपला वेगळा ठसा उमटविणाऱया चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. मंडळाच्या वतीने यंदाही चांदीच्या रूपातील गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घ्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केले आहे.

राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार हा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. उत्सव कालावधीत कोरोना या महामारीशी लढण्याकरिता घ्यावयाची काळजी तसेच ‘स्वच्छ परिसर-सुंदर परिसर’ यावर प्रबोधनपर व्याख्यान तसेच आरोग्य चिकित्सा शिबीर व कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.