कोथिंबीर जुडी फक्त 80 रुपये!

666

कोथिंबीर आणि किचनमध्ये असलेल्या अतूट नात्यात आता काहीशी दरी निर्माण होणार आहे. परतीचे तिकीट कन्फर्म असतानाही पावसाने आडीबाजी करत गेल्या महिनाभरापासून राज्यात मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राज्यावर ओल्या दुष्काळाचे संकट आले असून शेतातील पिके पुरती भुईसपाट झाली आहेत. कोथिंबिरीसह अन्य भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाल्याने नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटली आहे. त्यामुळे कोथिंबिरीने चांगलाच भाव खाल्ला असून एरवी 30 रुपयांना मिळणारी जुडी 80 रुपयांवर पोहचली आहे. याचा थेट परिणाम किचनमधील फोडणीवर होणार आहे. त्यामुळे गृहिणींचे टेन्शन जास्तच वाढले आहे. कोथिंबिरीबरोबरच पालक भाजीच्या जुडीचा दर 20 रुपयांवर गेला आहे.

  • एपीएमसीमध्ये दररोज तीन लाख जुडी आवक होते, मात्र गेल्या चार-पाच दिवसांत केवळ दीड-पावणेदोन लाख जुडी एवढीच आवक होत आहे. त्यामुळे दरात तिपटीने वाढ झाली असून किरकोळ बाजारातील दर त्यापेक्षाही जास्त आहे.

नाशिकमध्ये जुडीला 280 रुपये दर

अवकाळी पावसामुळे कोथिंबिरीची आवक मंदावल्याने कोथिंबिरीचा दर वधारला आहे. नाशिक बाजार समितीत शनिवारी रात्री कोथिंबिरीच्या जुडीला 280 रुपये एवढा भाव मिळाला. नाशिक बाजार समितीत शनिवारी चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीची फारच थोडी आवक होती. मागणी वाढल्याने कोथिंबिरीचा 28 हजार रुपये शेकडा म्हणजेच 280 रुपये प्रतिजुडी दराने लिलाव झाला. या जुडय़ा शिवांजली व्हेजिटेबल कंपनीने खरेदी केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या