
नव्या वर्षाच्या पहाटेपासून मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरवणाऱया थंडीने यंदाच्या हंगामातील मुंबईतील आपला मुक्काम पक्का केला आहे. गेल्या तीन दिवसांत थंडीचा कडाका वाढला असून आठवडाभरात शहर व उपनगरातील तापमानात आणखी घट होणार आहे. या गारव्याचा सुखद अनुभव घेणाऱया मुंबईकरांनी घरातील तसेच लोकलमधील पंख्यांना आराम दिला आहे. तसेच रात्रीच्या सुमारास चौकाचौकात शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पाऱयाने 15 अंशांची पातळी गाठली. उत्तरेकडील थंड वाऱयांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा वळवल्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. रात्री आणि पहाटेच्या सुमारास कुडकुडणारे मुंबईकर दिवसाही स्वेटर घालूनच कामावर ये-जा करू लागले आहेत. शुक्रवारी कुलाबा आणि सांताक्रुझच्या कमाल तापमानात गुरुवारच्या तुलनेत आणखी घट झाली.
तळीरामांचा ‘झिंग झिंग झिंगाट’
थंडीच्या वाढत्या कडाक्याने तळीरामांचे ‘झिंग झिंग झिंगाट’ सुरू झाले आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री ओल्या पाटर्य़ांत रंगलेले तळीराम थंडीचा कडाका कायम राहिल्याने दारूच्या दुकानांबाहेर गर्दी करू लागले आहेत. किंबहुना, कॉर्पोरेट ऑफिसबाहेर सिगारेटच्या झुरक्यांचा धूर वाढला आहे, तर दारू-सिगारेटला हात न लावणाऱ्यांची चहाच्या टपरीवर गर्दी होऊ लागली आहे.




























































