मुंबईत थंडीचा विक्रम, बुधवार ठरला वर्षातला सर्वात थंड दिवस

cold-wave

मुंबईत बुधवारी थंडीचा विक्रम नोंदला गेला. बुधवार हा चालू वर्षातील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस ठरला. बुधवारी किमान तापमान 15.3 डिग्री सेल्सियस इतके नोंदले गेले. यंदाच्या हिवाळ्यात यापूर्वी सर्वात किमान 15 डिग्री इतके तापमान गेल्या 29 डिसेंबर रोजी नोंदले गेले होते.

गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये सर्वात कमी तापमान 11.4 डिग्री सेल्सियस इतके नोंदले गेले होते. नैऋत्येकडून येत असलेल्या थंड व कोरडय़ा वाऱयांमुळे मुंबईत पुढील काही दिवस थंडगार वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 10 ते 12 डिग्री सेल्सियस इतके तापमान राहील असेही हवामान खात्याचे उपसंचालक के. एस. होशाळीकर यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या