
मुंबईतील कोरोना रुग्णांना तातडीने खाटा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या ’वॉर्ड वॉर रूम’मधून आतापर्यंत तब्बल 82 हजार 993 रुग्णांना खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या सर्क 24 कॉर्डमध्ये 24 तास ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी पालिकेच्या विविध विभागातील सुमारे 30 हजार कर्मचारी काम करीत आहेत.
कोविडबाधित रुग्णांना अधिकाधिक प्रभावी वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महापालिकेची रुग्णालये, शासकीय वा निम-शासकीय रुग्णालयांसह निश्चित करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटांचे अधिक जलद गतीने वितरण करता यावे यासाठी पालिकेच्या सर्क 24 विभाग कार्यालयांमध्ये 24 ‘वॉर्ड वॉर रुम’ या जून 2020 पासून सुरू करण्यात आले आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार ही बेड अलॉटमेंट सुरू आहे. ‘बेड अलॉटमेंट’ पद्धती अंतर्गत रुग्ण ज्या विभागातील असेल, त्या विभागाच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे ‘बेड अलॉटमेंट’ करण्यात येत आहे. तसेच सर्क 24 ‘वॉर्ड वॉर रुम’ या एका संगणकीय प्रणाली आधारित ‘डॅश बोर्ड’वर खाटांची माहिती नियमितपणे अद्ययानवत करण्यात येत आहे. पालिकेच्या ’1916’ क्रमांकासह प्रत्येक वॉर्ड वॉर रूममध्ये उपलब्ध क्रमांकावर संपर्क केल्यास बेड उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मार्गदर्शन, समुपदेशनचेही काम
खाटा वितरणासोबतच कोविड बाधित रुग्णांना, रुग्णाच्या नातेवाईकांना व निकटच्या संपर्कातील व्यक्तींना तसेच विभागातील नागरिकांना दूरध्कनीद्वारे समुपदेशन करण्याचे आणि अति जोखीम गटातील व्यक्तींशी संपर्क साधण्याचे व त्यांनाही समुपदेशन करण्याचे महत्काचे कार्यदेखील ‘वॉर्ड वॉर रुम’द्वारे करण्यात येत आहे. तसेच कोविड विषयक वैद्यकीय चाचणी अहवालांचे व्यवस्थापन करण्यासह याबाबतची माहिती संकलित करण्याचे कामही ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारे करण्यात येत आहे. हे काम करण्यासाठी 3 पाळ्यांमध्ये एकूण 24 ते 30 कर्मचारी कार्यरत आहेत.

























































