सलग पाचव्या दिवशी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या 300 पार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आज सलग पाचव्या दिवशी 300 पार झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 318 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत मुंबईत आढळलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाख 65 हजार 296 इतका झाला. आज आढळलेल्या 318 कोरोनाबाधितांपैकी 298 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. 20 बाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यात फक्त तीन रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता भासली आहे. गेल्या चोवीस तासांत 150 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी असलेल्या 24472 खाटांपैकी फक्त 98 खाटांवर रुग्ण आहेत.