
मुंबईत बुधवारी दिवसभरात 675 कोरोना रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 531 जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 371 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयात कोरोवर उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 210 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 80 हजार 853 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 371 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 525 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 25 लाख 33 हजार 640 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 471 वर पोहोचली आहे.
राज्यात दिवसभरात 3,009 जण कोरोनामुक्त
कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 3 हजार 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.75 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 556 कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.55 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 35 लाख 62 हजार 194 चाचण्या झाल्या असून 19 लाख 78 हजार 44 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 26 हजार 599 जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 496 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.






















































