
कोरोनाविरोधात मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध मोहिमांमुळे मुंबईत सलग दहाव्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजारच्या आत आली आहे. आज दिवसभरात 585 कोरोना रुग्णांची नोंद झाली. मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून मंगळवारी दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 565 जण कोरोनामुक्त झाले. मुंबईत आतापर्यंत 20 लाखांहून जास्त कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
मुंबईत विविध दीर्घकालीन आजार असलेल्या 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 10 हजार 920 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 87 हजार 175वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर आले आहे, तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढून 284 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता 12 हजार 77 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 20 लाख 13 हजार 277 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 87 हजार 175 वर पोहोचली आहे.

































































