मुंबईत कोरोनाचे 1297 नवे; रुग्ण, 44 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या एकाच दिवसात 1297 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 593 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या 39 हजार 744 वर पोहोचली आहे.

मुंबईत शुक्रवारी नोंदवण्यात आलेल्या एकूण मृत्यूंमध्ये 73 प्रलंबित अहवालांचा समावेश असल्याचेही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील एकूण मृत्यूंची संख्या आता 4177 झाली आहे. तर नव्या कोरोनाबाधितांमुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 72 हजार 287 वर पोहोचली आहे. मात्र यातील 39 हजार 744 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे मुंबईत सद्यस्थितीत 28 हजार 266 एक्टिव्ह केसेस असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.