
मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे 1,228 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत ८०३ जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 69 हजार 340 वर पोहोचली आहे.
मुंबईत 62 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 582 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 24 हजार 057 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 21 हजार 345 चाचण्या झाल्या आहेत.
राज्यात कोरोनाच्या 1 लाख 20 हजार रुग्णांवर उपचार
राज्यात आज 2217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.81 टक्के असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 60 हजार 357 झाली आहे. कोरोनाच्या 8308 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 20 हजार 480 रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मुंबईत 1,228 नवे रुग्ण, 62 मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 1,228 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 803 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एपूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 69 हजार 340 वर पोहोचली आहे. मुंबईत 62 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 5 हजार 582 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 24 हजार 057 वर पोहोचली आहे.






















































