मुंबईत 1,174 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1,174 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 47 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 750 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 65 हजार 622 वर पोहोचली आहे.

मुंबईत 47 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 332 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 939 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 51 दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 3 लाख 96 हजार 500 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या