मुंबईत 969 नवे रुग्ण, 70 जणांचा मृत्यू

435

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 969 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1011 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 66 हजार 633 वर पोहोचली आहे.

मुंबईत 70 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 402 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 22 हजार 828 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 52 दिवसांवर आला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 01 हजार 741 चाचण्या झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या