मुंबईत 1,033 नवे रुग्ण, 39 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सोमवारी कोरोनाचे 1,033 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 1,706 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 81 हजार 944 वर पोहोचली आहे.

मुंबईत 39 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 129 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 21 हजार 812 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 85 हजार 563 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 10,129 वर पोहोचली.