संदीप पाटील यांची माघार‘एमसीए’ निवडणूक

373

येत्या 4 ऑक्टोबरला होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी हितसंबंधांच्या मुद्दय़ावरून या निवडणुकीतून माघार घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बाळ महाडदळकर गटासाठी जवळपास सर्व उमेदवार निश्चित झाले आहेत. संदीप पाटील यांनी माघार घेतल्यामुळे अध्यक्षपदासाठी नव्या उमेदवाराचा शोध सुरू आहे.

बाळ महाडदळकर गटातील संभाव्य उमेदवार: उपाध्यक्ष- अमोल काळे, सेक्रेटरी- संजय नाईक, खजिनदार- मयांक खांडवाला, सहसचिव- जगदीश आचरेकर, कमिटी मेंबर- नदीम मेमन, लक्षण चव्हाण, अजिंक्य नाईक, गौरव पय्याडे, खोदादार इराणी, अभय हडप, विहंग सरनाईक, नील सावंत, सुरेंद्र शेवाळे.

आपली प्रतिक्रिया द्या