
किस्तान विरोधात हिंदुस्थानने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ विरोधात एका महिलेने समाजमाध्यमावर गरळ ओकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांत त्या महिलेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मालवणी-मालाड परिसरात राहणाऱया त्या महिलेने दोन दिवसांपूर्वी तिच्या फेसबुक खात्यावर ऑपरेशन सिंदूरबाबत टीका केली होती. त्यात तिने आक्षेपार्ह शब्दांचा देखील वापर केला होता. हा प्रकार समोर येताच मालवणी पोलिसांनी याची तत्काळ गंभीर दखल आज तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. ती महिला ब्युटीपार्लर चालवते. पोलिसांनी तिला नोटीस बजावली असून तिला सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.