
बँकेचे क्रेडिट कार्ड स्वॅप न करता वांद्रे पूर्व येथे राहणाऱया एका महिलेच्या खात्यातून 4 लाख 99 हजार रुपये काढले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री त्या जेवण्यासाठी वांद्रे परिसरात आल्या होत्या. तेव्हा त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज येण्यापूर्वी महिलेने कार्डचा वापर केला नव्हता. या घटनेनंतर महिलेने बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. बँकेने कार्ड ब्लॉक केल्यावर महिलेने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुठेही व्रेडिट कार्ड स्वॅप न करता खात्यातून 4 लाख 99 हजार रुपये गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महिलेच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.