डिलिव्हरी बॉय बनला देवदूत! रुग्णाला बाईकवर बसवून थेट गाठलं रुग्णालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तो नसता तर….

डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार घेतल्यानंतर आता निवृत्त कर्नल मलिक हे ठणठणीत बरे झाले असून त्यांनी या डिलिव्हरी बॉयचे मनापासून आभार मानले आहेत. मृणाल आज नसता तर मी माझ्या कुटुंबासोबत नसतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. तो माझ्यासाठी तारणहार आहे, असे म्हणत त्यांनी मृणालचे आभार मानलेत.

मुंबईच्या ट्रफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून देणाऱया आणि एका रुग्णाचे जीव वाचवणाऱया एका फूड डिलिव्हरी बॉयचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. फूड डिलिव्हरीच्या डय़ुटीवर असताना डय़ुटीपलीकडे जाऊन मोठं काम करणाऱया या बहाद्दर मुंबईकराला सगळे सलाम ठोकत आहेत.

स्विगी या फूड डिलिव्हरी करणाऱया कंपनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कर्मचाऱयाच्या माणुसकीचे कौतुक केले आहे. मृणाल किदरत असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. नाताळच्या दिवशी ही घटना घडली होती. मृणाल किदरत याच्यामुळे एका निवृत्त कर्नलचा जीव वाचला. निवृत्त कर्नल मोहन मलिक यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी कार काढली. कारमधून जात असताना मुंबईच्या ट्रफिकमध्ये ते अडकले. रुग्णालय कसे गाठायचे? असा प्रश्न कर्नल आणि त्यांच्या मुलापुढे उभा राहिला होता. ट्रफिकमुळे कार जराही पुढे सरकत नव्हती. अशा वेळी एखादा बाईकवाला आपल्याला मदत करेल म्हणून कर्नल मलिक यांचा मुलगा खाली उतरला. त्याने बाईकवाल्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण कुणीच थांबायला तयार होईना.

अशातच फूड डिलिव्हरी करण्यासाठी निघालेला मृणाल किदरत याने सगळा प्रकार बघितला. आपले काम बाजूला ठेवून तो निवृत्त कर्नल मलिक यांचा जीव वाचवण्यासाठी आत्मीयतेने धावला. मृणाल हा स्विगीसाठी काम करत असून तो सांताक्रुझला राहतो. मलिक यांची तब्येत बिघडत चालल्याचे बघून मृणालने त्यांना आपल्या बाईकवर बसवले आणि थेट लीलावती रुग्णालयात नेले. ट्रफिकमधून कशीबशी वाट काढत, हॉर्न वाजवत तर कधी मोठय़ाने ओरडून लोकांना बाजूला करत त्याने रुग्णालय गाठले. तसेच रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांना धावत जाऊन सांगितले.