‘कोहिनूर’मध्ये आता पार्किंगसह चार्जिंग! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन बुकिंग, कार वॉश, पॉलिश, ड्रायव्हर-प्रवाशांसाठी कॅण्टिन अशा सुविधा असणाऱया दादरच्या कोहिनूर सार्वजनिक पार्किंगमध्ये आता ऑनलाइन पार्किंगसह चार्जिंगची सुविधाही मिळणार आहे. सार्वजनिक पार्किंगमधील राज्यातील पहिल्याच चार्जिंग सुविधेचे आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

पर्यावरण रक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिका आणि सरकारकडूनही प्रोत्साहन देण्यात येत आहे. या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. यानुसार दादर पश्चिम येथील कोहिनूर सार्वजनिक पार्किंगमध्ये राज्यातील पहिले ‘ई.व्ही. चार्जिंग स्टेशन’ सुरू करण्यात आले. यावेळी आमदार सदा सरवणकर, मनीषा कायंदे, नगरसेविका प्रीती पाटणकर, श्रद्धा जाधव, सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते.

ऑनलाइन बुकिंग करता येणार

सार्वजनिक पार्किंग आरक्षणासाठी नागरिकांना ऑनलाइन अॅपद्वारे आरक्षण सुविधादेखील उपलब्ध असून ‘ओटोपार्क मोबाईल अॅप्लिकेशन’द्वारे कोहिनूर सार्वजनिक वाहनतळावर ऑनलाइन पार्किंग आरक्षित करता येईल. ऑनलाइन बुकिंग अॅपचालकांना वाहनतळामध्ये पार्किंगची ताशी किंवा मासिक आधारावर आरक्षण करण्यास मदत करेल. तसेच वाहनतळावर आल्याकर पार्किंगची खात्रीशीर जागा मिळकून देईल. यामुळे पार्किंगसाठी जागा शोधण्यातला केळ वाचणार असून इंधन खर्चातदेखील बचत होणार आहे. हे अॅप मुंबईकरांना ‘नो पार्किंग’ क्षेत्रात आल्यावर सूचना पाठवून दंड आकारण्यापासून मदत करेल.

अशा असणार सुविधा

  • पार्किंग व चार्जिंग एकाच ठिकाणी उपलब्ध असणाऱया या चार्जिंग स्टेशनमध्ये एकावेळी 7 इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • यापैकी 4 ‘चार्जर’ हे जलद चार्जर आहेत. या प्रत्येक चार्जरद्वारे साधारणपणे एका तासात एक वाहन याप्रमाणे एका तासात एकावेळी 4 वाहने ‘चार्ज’ करता येऊ शकतात.
  • याव्यतिरिक्त 3 चार्जर हे स्लो चार्जर या प्रकारातील असून याद्वारे 1 वाहन चार्ज करण्यास साधारणपणे 6 तासांचा कालावधी लागतो. या ठिकाणी वाहन चार्ज करण्यासाठी प्रतियुनिट 15 रुपये शुल्क आकारण्यात येतील.
  • हे चार्जिंग स्टेशन आठकडय़ाचे सातही दिवस 24 तास नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यरत राहणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.