मतदान केंद्राची बत्ती गुल झाल्यास वीज कर्मचाऱयांवर कारवाई

370

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या सोमवारी राज्यभर मतदान होणार आहे. यावेळी मतदान केंद्रावरील बत्ती गुल झाली तर संबंधित वीज कर्मचाऱयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावरील वीजपुरवठा सुरळीत रहावा म्हणून संबंधितांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे बजावले आहे.

राज्यातील 288 विधानसभा क्षेत्रात हजारो मतदान केंद्रे असणार आहेत. तसेच मतदान प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून पार पडणार आहे. त्यामुळे बॅटरी चार्ज करण्यबरोबरच कर्मचाऱयांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रावर अखंडित वीज पुरवठा सुरू असणे गरजेचे आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने पूर्ण वेळ वीज पुरवठा सुरू ठेवण्याबाबत बजावले आहे. त्याची दखल घेत महावितरणने विजेअभावी मतदान केंद्रावर गैरसोय होऊ नये, ट्रान्सफॉर्मर निकामी होऊ नये, वीज वाहिनीत बिघाड होऊ नये म्हणून खबरदारी घेतली आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यास तत्काळ निवडणूक अधिकाऱयाला कळवा
तांत्रिक बिघाडामुळे वीज केंद्रावरील किंवा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती बाधित होणाऱया मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱयाला द्यावी. तसेच वीज पुरवठा किती वेळात पूर्ववत होईल हेही सांगणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर सदर तांत्रिक बिघाड तत्काळ दुरुस्त करावा असेही बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या